रूमानिया
रूमानिया : सोशालिस्ट रिपब्लिक ऑफ रूमानिया. यूरोपातील नवनिर्मित स्वतंत्र देशांपैकी एक देश. यूरोपच्या आग्नेय भागातील या देशाचा विस्तार ४३०३७' उ.ते ४८०१५' उ. अक्षांश व २००१५' पू. ते २९०४१' पू. रेखांश यांदरम्यान आहे. सर्वसामान्यपणे गोलाकार असलेल्या या देशाचे क्षेत्रफळ २,३७,५०० चौ.किमी. असून लोकसंख्या २,२७,२४,८३६ (१९८६) होती.